अंबड/प्रतिनिधी- शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या समोरील जालना बीड रोडवर एक तिस वर्षीय युवक पायी रस्ता ओलंडत असतांना त्यास टाटा आयशरने ठोस दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज दि.3 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना बीड रोडवर अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिराजवळ एक अनोळखी तिस वर्षीय युवक हा रस्ता ओलंडत असतांना त्यास बीडकडुन जालना कडे जाणारा टाटा कंपनीचा हायशर क्र. पि.बी.02-ए.आर.9985 च्या चालकाने त्यास ठोस दिल्याने त्याचे डोके गाडीच्या खाली येऊन तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती शहरातील डॉ.रामेश्वर राजगुडे, नगरसेवक जाकेर डावरगावकर, संदिप खरात, मतिन पटवा, पत्रकार विष्णु भापकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीसांना माहिती दिली. तेव्हा अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.डी.सोन्ने, पोलीस उपनिरीक्षक डी.पि.वाघ,ए.एस.आय.बोडखे, शेळके, जाधव, जमादार सैबी, पिल्ले, गडकरी, चव्हाण, हावळे आदींनी घटनास्थळी हजर आले. व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करुन सदर मयत युवकास शवविछेदन करणे कामी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल केले. सदर मयत युवकावर पोलीसांनी पंचनामा करुन त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता असता त्याच्या पेंन्टच्या खिशातुन अंबड रुईचे एक टिकीत सापडले आहे. तसेच त्याच्या उजव्या हातावर ओम गोंदलेले आहे. मात्र अज्ञाप पावेतो सदर युवकाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अंबड पोलीसांनी सदर आयशर व चालक यास ताब्यात घेतलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here