रविवारी दि.६ में रोजी स्थानिक अभिनव सहकारी बँक लिमिटेड ही केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक अग्रगण्य व नामांकित असलेली व करोड़ो रूपयाची उलढ़ाल करणाऱ्या बँकेची ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या अभिनव बँकेच्या निवडणुकीत प्रगतिपताच प्रतीक ,आपलं हक्काच पैनल मानले जाणारे रमेशदादा पाटिल प्रणीत अभिनव पैनल व शंकरकाका भोईर यांचे श्री समर्थ पैनल चे उमेदवार या दोघांच्या पैनलची निवडणूक आमने-सामने होणार आहे. दूसरीकड़े अभिनव सहकारी बँकेच्या सभासदांची अशी चर्चा आहे की जरी दोन पैनलचीही निवडणूक जरी मानली जात आहे तरी रमेशदादा पाटील समर्थक अभिनव पैनलचे सर्वच उमेदवार शंभर टक्के निवडूण येणार असल्याचे शिवनेरी न्यूजला बोलताना सांगितले. ४२ लाखाच्या तोट्यात असणारी ही बँक अभिनव पैनलच्या अथक प्रयन्ताअंती आज तब्बल रु.५.४६ कोटी रुपये अशा घसघशीत नफ्यात आणलेली ही पहिली बँक आहे. विशेष म्हणजे राजीनामे देणारे तत्कालीन संचालक बँकेच्या तेव्हांच्या तोट्याचे धनी होते हेही आज इथे स्पष्ट झाले आहे.अशा अपवादात्मक परिस्थितीत २००९ साली अभिनव पैनलचे प्रमुख रमेशदादा पाटील यांनी बँकेचे अध्यक्ष पद स्विकारले आणि है ” नफ्याचा चमत्कार ” घड़ण्यास सुरुवात झाली.केवळ ६ शाखावरुन १७ शाखा ,सातत्याने राखलेला अ औडिट वर्ग सभासदांना १४ टक्के लाभांश ,कर्मचारी वर्गास १२ टक्के बोनस असे प्रगतिचे एकएक टप्पे पार करत प्रगतिची वाटचाल सुरु झाली ती आजतागायत यशस्वी करुंन दाखवली आहे.असा अभिनव सभासदांचा ठाम विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here