रंगभूमी आणि मालिकांमध्ये विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संतोष मयेकर यांच अकाली निधन झालं रदय विकाराच्या धक्क्याने मयेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला भय्या हातपाय पसरी, वस्त्रहरण, फु बई फु सारख्या नाटक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या गेल्या काही महिन्यांपासून संतोष आजारी होते मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहे दिग्गज अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच निधन झाल्यावर वस्त्रहरण या नाटकात त्यांनी तात्याची भूमिका साकारली होती पाच हजाराव्या प्रयोगातही संतोष मयेकर यांनीच तात्या सरपंच साकारले होते भैया हात पाय पसरी, वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका, टाइम प्लीज, वाऱ्यावरची वरात ,मिस्टर नामदेव म्हने डॅंबीस भोळे, ऑल द बेस्ट या नाटकातल्या त्यांच्या भूमिका ही जबरदस्त गाजल्या होत्या फु बाई फु या मराठी रियालिटी शोमध्ये ते अभिनेत्री प्रिया बेर्डे सोबत झळकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here