ट्रामडोल ड्रुग्ज त्यालाच फायटर ड्रग्ज असे म्हटले जाते ,याचा आयएसआय मधिल अतिरेकी , इराण , इराक , मधे टेरोरिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये वापर केला जातो , जर एकाद्या अतिरेक्याला गोळी लागली आणि त्याने जर हे ड्रुग्ज घेतले तर त्याला वेदना जाणवत नाहीत ,पाच ते सहा तास त्या व्यक्तीच्या संवेदना बधिर होतात , ह्याच कारणा मुळे वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ह्या औषधांवर बंदी घातली आहे , आणि ह्याच औषधाच्या एकूण 9800 स्ट्रीप्स चा माल हस्तगत करण्यात आला आहे , ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहीती नुसार ठाणे येथील ब्रम्हांड येथे सापळा रचून मयुर प्रविण मेहता वय 46 याला 9800 गोळ्यांच्या स्ट्रीप्स सह ताब्यात घेतले , त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता , हे औषध तो भारतामध्ये व भारताबाहेर बेकायदेशीर मार्गाने विकणार होते , भारतात याची किमंत 12,79,500/- रुपये आहे , मयुर मेहता याने दिलेल्या माहीती नुसार रोमेल लॉरेन्स वाज , रमेश रघुनाथ पांडे , दीपक भोगीलाल कोठारी यांचा शोध घेउन त्यांना अटक करण्यात आली त्यांना सगळयांना 1/10/2018 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे , असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगीतले ,हे ड्रुग्ज यांनी इंदौर येथुन विकण्या साठी आणल्याचे सांगीतले तसेच ह्या आरोपींचे गोळ्या बनवण्याच एक युनिट अंधेरी येथे असुन तिथे सुध्दा हे गोळ्या बनवण्याच काम करत होते , ह्या ड्रग्जची व्याप्ती अजुन वाढण्याची शक्यता आहे .ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक विकास घोडके करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here