सोनारपाडा येथील जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्री शिवाजी जोंधळे यांनी दिनांक १४/९/१८ रोजी सोनारपाडा येथील गुरचरण येथे असलेल्या विसर्जन तलावात गणपती विसर्जन करण्यास विरोध करून आपल्या आगरी समाज्या विषयी केलेले उद्धट उदगार तसेच आमदार व खासदार यांचा एकोरी भाषेत केलेला उल्लेख आणि ग्रामस्थांशी केलेले उद्धट वर्तन या विषयी संपुर्ण आगरी समाजात व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कल्याण ग्रामीण चे आमदार मा.श्री. सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज दिनांक १६/९/१८ सायंकाळी ५.३०वाजता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन काब्दुले साहेब यांच्या दालनात ए.सी.पी मा.श्री. वाडेकर साहेब यांच्या सोबत चर्चा केली व त्या मध्ये श्री. शिवाजी जोंधळे यांचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबधी व सदर तलावात विसर्जन करण्या संदर्भात चर्चा झाली त्या वेळेस मा.श्री सुभाष भोईर यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही सदर तलावतच विसर्जन करणार असे ठणकावून सांगितले त्या वेळेस श्री. वाडेकर साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्या तलावात विसर्जन करण्यास परवानगी दिलेली आहे. सदर तलावात विसर्जन करण्यासंदर्भात मा.पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री. एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिका-रांशी चर्चा करून त्यांना गणपती विसर्जन करण्याचे आदेश देण्यास सांगितले तसेच मा.श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी शिष्टमंडळासमोरच श्री. काब्दुले साहेब यांना फोन वरून कोणत्याही परिस्थितीत गणपती विसर्जन सदर तलावतच करण्याचे आदेश दिले. या पुढे महाराष्ट्र सरकारने शिवाजी जोंधळे यांना सोनारपाडा येथील नवीन सर्वे नं.०५ येथील गुरचरण सन२००९ पासून ३०वर्षा करिता सोनारपाडा ग्रामपंचायतीची हरकत असताना भाड्या पट्याने दिलेली आहे त्या संदर्भात कायदेशीर लढा दिला जाईल. सदर शिष्टमंडळात शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे साहेब,स्थानिक नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील,संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री. गणेश म्हात्रे साहेब , मा.सरपंच श्री. मुकेश पाटील साहेब ,विभाग प्रमुख श्री केशव पाटील ,मा.नगरसेवक श्री.पंढरीनाथ पाटील, मा.पंचायत समिती सदस्य श्री. बाळाराम म्हात्रे,मा.सरपंच श्री. रवींद्र म्हात्रे(सांगावं),युवासेना तालुका प्रमुख योगेश म्हात्रे, श्री.जितेंद्र ठाकूर, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here