घाटकोपर मधील भाजप आमदार श्री राम कदम यांची मनसेने पोस्टरबाजी करून खिल्ली उडवली आहे .प्रजा फाउंडेशनने नुकताच प्रसिध्द केलेल्या आमदार कामगिरी अहवालात आमदार राम कदम यांचा शेवटचा 32 वा क्रमांक मिळाला असल्यामूळे घाटकोपर मधील चौका चौकात मनसेने खिल्ली उडवन्यासाठी फ्लेक्स लावले आहेत तसेच त्यावर अभिनंदन देखील केले आहे .राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाहि त्यात उल्लेख केला असून सदर प्रभागात कोणतीही विकास कामे होत नसल्यामुळे अहवालात शेवटचा क्रमांक मिळाला आहे असे मनसे विभाग अध्यक्ष गणेश चूक्कल यांनी माहिती दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here