कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातल्या विविध नागरी समस्या सोडवण्यात आणि नागरीकांना मुलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ, प्रशासन प्रमुख म्हणून मा. आयुक्तांनी विविध बैठकींच्या वेळी दिलेली आश्वासनं न पाळल्याच्या निषेधार्थ दिनांक 5 ऑक्टोबर सकाळी 11 पासुन बाटा शोरूम समोर आग्रा रोड येथे आणी कल्याण पूर्व गणपती मंदिर जवळील रिक्षा स्टॅन्ड जवळआमरण उपोषण श्रीनिवास घाणेकर यांच्या नेतृतवा खाली चालू आहे महापालिका कोणत्याही सोईसुविधा देत नाही. नुसतेच कर जमा करते. कल्याण पश्चिम येथील आधारवाडी कचरा डेपो कोर्टाने आदेशीत करूनही बंद होत नाही. रस्त्यावर प्रचंड खर्च होऊनही खड्डे कायम आहेत. महापालिका उदासीन, लोकप्रतिनिधी निष्क्रिय.. शेवटी नागरिकांनाच पुढाकार घ्यायला लागत आहे. ,जागरूक नागरीक मंचा तर्फ़े साह्याची मोहीम हाती घेतली यात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला आमच्या मागण्या पूर्ण होई परियन्त आमरण उपोषण चालूच राहील असे कार्यकर्त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here