कल्याण डोंबिवली रिक्षाचालकांनी रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आपल्या मागण्यासाठी काल आंदोलन केले,यावेळी कल्याण आर.टी.ओ कार्यालयावर रिक्षा चालकांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.रिक्षा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल कांबळे यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.बजाज शोरूम चालकांकडून जादा पैसे घेऊन करण्यात येणारी लुबाडणूक,खराब रस्त्यांमुळे रिक्षांचे होणारे नुकसान,कल्याण डोंबिवली शहरातून खाजगी वाहन चालकांकडून होणारी बेकायदा वाहतूक .बेकायदा रिक्षा चालकांकडून ग्राहकांची होणारी लुट,त्यांच्याकडून प्रवाशांना मिळणारी अरेरावीची वागणूक त्यामुळे बदनाम होणारा रिक्षा व्यवसाय, अशा अनेक मागण्या या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आर.टी.ओ.परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.****** २. कल्याण रेल्वे स्थानकाचा एअरपोर्ट प्रमाणे विकास करणार. कल्याण – कल्याण भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपील पाटील यांनी काल कोणतीही पूर्व सूचना न देता कल्याण रेल्वे स्थानकाला भेट दिली. कल्याण रेल्वे स्थानकाचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्यासाठी प्रयत्न सुरु असून तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरवात केली जाईल. अशी माहिती त्यांनी या भेटीत दिली. स्थानिक भाजपचे आमदार नरेंद्र पवार,उपमहापौर उपेक्षा भोईर,कल्याण शहर भाजपा अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे,नगर सेवक वरुणा पाटील,अर्जुन भोईर हे यावेळी उपस्थित होते. श्री पाटील यांनी रेल्वे स्थानकातील प्लाटफोर्म ,आरक्षण केंद्र,तिकीट केंद्र, बंद अवस्थेतील एटिव्हिएम केंद्र यांची पाहणी करून प्रवाशांनशीही सवड साधला.रेल्वे स्थानकातील स्कायवॉक वरील वाढते फेरीवाले आणि दुरवस्था या बद्दल कपिल पाटील यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या कडे तीव्र नापसंती व्यक्त करीत रेल्वे अधिकार्यंशी चर्चा करून फेरीवाल्यांना हटवण्याच्या सूचना केल्या प्रथम वर्गातील विना तिकीट प्रवासी मोठ्या संखेने येत असल्या बद्दल प्रवाशांनी पाटील यांच्या कडे नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here