कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, तसेच टिटवाळासह काही ग्रामीण भागात काल रात्री ९ते १० च्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसले.डोंबिवली,श्रीमलग पट्टी व अंबरनाथ भागात हा धक्का अधिक प्रमाणात जाणवला . यावेळी काही गूढ आवाजही झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.यामुळेच हे धक्के नेमके कशाचे होते याबद्दल नागरिकात संभ्रम निर्माण होऊन काही प्रमाणात घबराट निर्माण झाली होती.भूकंप असल्याचे मेसेजही व्होट्स एपवर थोड्याच वेळात फोरवर्ड झाले. मात्र शासनाकडून हे धक्के कसले होते व गूढ आवाज कसला होता याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही;*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here