गणेश उत्सवात प्रत्येक जण बाप्पा साठी वेगवेगळी आरास करतात. तर सार्वजनिक मंडळ बाप्पाच्या मंडपात मोठाले देखावे तयार करतात. पण स्वतःच्या घरात कोणी मोठाले देखावे फारसे करताना नाही दिसतात. मात्र टिटवाळाच्या रहिवासी आणि गणेश भक्त रत्नाकर पाटिल यांनी मोठा बाप्पासाठी आणि भाविकांनसाठी आपल्या घरात मोठा देखावा तयार केला आहे यात तिरुपती बालाजी , महालक्ष्मी मंदिर आणि गोकुळ धाम या मंदिराची  प्रतिकृती उभारली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक मंडळाना सुद्धा लाजवेल अशी प्रतिकृती उभारली आहे. कोणतीही वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून तब्बल लाखो रुपये खर्च करून तीन मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. गेले 18 वर्ष पाटील आपल्या घरी देशातील आणि राज्यातील विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारत आहे. मागच्या वर्षी दत्ताचे 3 अवतार गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि साई बाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृती उभारल्या होत्या. सम्पूर्ण देखावा उभारण्यासाठी तब्बल 45 दिवस लागत असून याला पाटील यांचा परिवार आणि मित्राची मदत होते. प्रतिकृती बनवण्याच्या आधी पाटील स्वतः आणि कारागीर त्या मंदिराचे दर्शन घेऊन येतात. पाटील यांचा गणपती 10 दिवसाचा असून डोंबिवली ते कसारा या सर्व पट्ट्यातुन भाविक देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात. यावेळी पाटील यांनी सांगितले की अनेक भाविकांना देशातील मंदिरे पाहिला मिळत नाही किव्हा तेथे जाईल परवडत नाहीं त्याकरिता आम्ही या प्रतिकृती तयार करतो आणि भाविकांना सुद्धा याला पाहण्यासाठी गर्दी करितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here