ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप शर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून वरिष्ठांची परवानगी व मार्गदर्शनाखाली खंडगी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कौसा मुंब्रा ठाणे येथे सापळा रचून आरोपी नामे अविल प्रकाश राबर्ट मोंथेरो वय २९ वर्षे राहणार खारघर नवी मुंबई शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे कब्जात असलेले मनोव्यापार परिणाम करणारी चार किलो ग्रॅम वजनाची इफेड्रीन पावडर असा एक कोटी रुपये किमतीच्या माल हस्तगत केला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक विलास वसंत कुटे यांनी सरकार तुर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १९९/२०१८ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५चे कलम८(क),९(ए),२५(ए) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा तरुण मुला मुलींसाठी रेव्ह पार्टी मौज मजा करण्यासाठी मुंब्रा भागात विकण्यासाठी चेन्नई राज्यातून आणला असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here