टेंभुर्णी :- टेंभुर्णीतील श्री. संत रोहिदास आश्रम शाळे विषयी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत असे सांगून शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते यांना पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी हिच्यासह पतीपत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते शाळेविषयी कसलीही तक्रार नसताना टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी अनुसया सुतार,मोहोळ येथील ओम बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष अभय बंडगर यांनी दि. ८ जुलै २०१८ रोजी तुमच्या शाळेविषयी गंभीर तक्रारी आहेत असे सांगून पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्या मिटविण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हा सरकारी वकील यांचा अभिप्राय आल्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल होताच टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी अनुसया सुतार हिच्यासह अभय बंडगर त्याची पत्नी सविता बंडगर हे फरार झाले होते.यानंतर त्यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी २१ ऑगष्ट रोजी अर्ज दाखल केला होता.या अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती सावंत-वाघुले यांच्या न्यायालयात १ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. मात्र निकाल राखून ठेवण्यात आला होता.आज दि.६ सप्टेंबर २०१८ रोजी न्यायालयाने आरोपींच्या जमीन अर्ज फेटाळून लावला. यावेळी सरकारी वकील म्हणून अड अहमद काझी यांनी बाजू मांडली.तर मूळ फिर्यादीच्या वतीने अड हरिश्चंद्र कांबळे यांनी तर आरोपींचा वतीने अविनाश काळे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here