मुंबई नाशिक महामार्गावरील मुजोर टोल कंपणी विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामिन च्या वतीने दि २१/०९/१८ रोजी सकाळी १० वा. पडघा टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात येनार आहे.तरी या आंदोलनात शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामिनचे सर्व पदाधिकारी व समस्त शिवसैनिकांनी आंदोलनात सहभागी होवुन मुजोर टोल कंपणीला धडा शिकवावा ही विनंती. आंदोलनातील प्रमुख मागण्या 1) टोल कंपणीचा भ्रष्ट व भोंगळ कारभार थांबलाच पाहिजे. 2) अपघातात मृत्यु झालेल्या प्रकरणी कंपणीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजेत. 3)आनेक वर्षापासुन मंजुर अंडरबायपास व सर्विस रोड त्वरीत सुरु झालेच पाहिजेत महामार्गा वरील सर्व खड्डे बुजवन्यात यावे 4) महामार्गावर दिवस रात्र दक्षता पथकाची नेमनुक करण्यात यावी. 5) महामार्गावरील आपघात प्रवण क्षेत्रांची उपाययोजना करण्यात यावी 6)पडघा ते कसारा संपुर्ण सर्वीस रोडची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी 7)सर्व मंजुर उड्डान पुलांचे कामे त्वरीत सुरु करावे 8) अपघात पिडीतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजेत. ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामीण व भिवंडी ग्रामिण विधानसभा मतदारसंघ .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here