गेल्या काही दिवसापांसून ठाणे पोलीस अणि  ठाण्यातील मराठा समाजात प्रचंड तणाव होता . या पार्श्वभूमीवर आज ठाणे पोलीस आयुक्त आणि मराठा मोर्चा ठाणे समन्वयक यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी समन्वयकांनी समाजाची भूमिका पोलिसांना समजावून सांगितली. तर  पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी , मराठा समाज हा या महाराष्ट्राच्या रक्षणकर्त्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे रक्षणकर्त्याने दगड हाती न घेता सनदशीर मार्गाने लढावे. असे सांगून मराठ्यांनी हे आंदोलन शांततेत आणि संयमाने करावे असे आवाहन केले. यावेळी मराठा समन्वयक जयंत सूर्यराव , रमेश आंबरे, कैलाश म्हापदी आणि दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here