शहरातील जे खड्डे भरण्यात आले आहेत त्या खड्ड्यांची दर आठवड्याला नियमित पाहणी करण्याबरोबरच ते खराब झाले असतील तर ते परत भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागाला दिले. या संदर्भात आज महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांची बैठक घेवून खड्ड्यांच्या बाबतीत प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी श्री. जयस्वाल यांनी सर्व उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रभाग स्तरावर जे खड्डे भरण्यात आले आहेत त्या खड्ड्यांची दर आठवड्याला पाहणी करण्यात यावी तसेच ते खड्डे खराब झाले असतील ते त्वरीत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here