विरोधी पक्षांनी दिलेल्या भारत बंदला ठाणे शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सक्रीय सहभाग नोंदविल्यामुळे ठाणे शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते तीन हात नाका दरम्यान बैलगाडी व घोडागाडी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये मोठया प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, वाढलेल्या इंधनाच्या दरांचा निषेध करण्यासाठी काढलेल्या या रॅलीमध्ये बैलगाड्यांचा व घोडागाड्यांचा समावेश करण्यात आला होता. आज सकाळी ठाणे शहरात बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसने रॅली काढल्यानंतर संपूर्ण शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. वाढलेले पेट्रोल- डिझेलचे दर, महागाई, बेरोजगारी, घसरलेला विकास दर, रुपयाचे अवमूल्यन आदींचा या रॅलीमध्ये निषेध करण्यात आला. एका बैलगाडीमध्ये आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्वार होऊन सदर रॅलीचे नेतृत्व केले. या रॅलीमध्ये शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, प्रदेश सचिव तथा नगरसेवक सुहास देसाई, माजी महापौर मनोहर साळवी, कळवा प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश बर्डे, नगरसेवक मुकुंद केणी, महेश साळवी, वहिदा खान, अंकिता शिंदे, आरती गायकवाड, वर्षा मोरे, माजी नगरसेवक अमित सरैय्या, माजी परिवहन समिती सदस्य सुरेंद्र उपाध्याय, शहर कार्यकारिणी सदस्य सरचिटणीस प्रभाकर सावंत, संदिप जाधव, कोपरी-पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष विजय भामरे, कार्यकारिणी सदस्य मकसूद खान, दिपक क्षत्रिय, हेमंत वाणी, गजानन चौधरी, अरविंद मोरे, तुळशीराम म्हात्रे, सचिन खुस्पे, महेंद्र पवार, डॉ. राणी देसाई, वंदना जाधव, नौपाडा ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, रायलादेवी ब्लॉक अध्यक्ष कुलदीप तिवारी, कार्याध्यक्ष रत्नेश दुबे, कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश फडतरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, ज्ञानेश्वर नगर ब्लॉक अध्यक्ष दत्तात्रय जाधव, वागळे इस्टेट ब्लॉक अध्यक्ष रविंद पालव, महिला अध्यक्ष करिना दयालानी, महिला पदाधिकारी रेखा देवदास, रेश्मा शाहा, विनीता सिंग, ज्योती निंबरगी, मेहरबानो पटेल, शशीकला पुजारी, सुरेखा शिंदे, मल्लिका पिल्ले, प्रिजी विजन्न, संगीता लोकरे, कांता गजमल, अनिता मोटे, जयश्री कोळेकर, वैशाली साळवी, सुजाता कांबळे अर्चना सिंग, हजी बेगम शेख, रेश्मा भाईगडे, मनिषा भोसले, युवक अध्यक्ष मंदार केणी, युवक पदाधिकारी दिपक पाटील, रोहीत भंडारी, संदीप पवार, विशाल खामकर, विक्रम खामकर, सुमित गुप्ता, श्रीकांत टाव्हरे, सुरज यादव, जावेद शेख, अमित तिवारी, विद्यार्थी पदाधिकारी प्रफुल कांबळे, संकेत नारणे, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, सेवादल अध्यक्ष बाळकृष्ण कामत, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष रामदास खोसे व इतर पदाधिकारी / कार्यकर्ते उपस्थित होते. News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here