आपल्या लाडक्या बाप्पा ला घरी नेण्यासाठी काल रात्री पासूनच डोंबिवलीत सुरुवात झाली होती तर काही भक्त मंडळी सकाळी गणपती कार्यशाळेपासून ते घरी आपल्या लाडक्या बाप्पा ला पूजा करून वाजत गाजत नेताना दिसले. यात लहान मुलांची सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. सर्वात म्हणजे डोंबिवली हे सांस्कृतिक शहर सणांची परंपरा पाळणार शहर ह्या शहरावरील संकट टळू देत ,सर्वाच रक्षण कर अशी मागणी शिवसेना नगरसेवक आणि शहरप्रमुख यांनी केली जुन्या चालीच्या गाण्याची झलक देत ब्रास बँड वाजत गाजत गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होता तर विविधतेने नटलेल्या बाप्पाला लोक आनंदाने घरी नेतानाचे चित्र डोंबिवलीत दिसले. शाहराचे बाजारपेठ मध्ये खरीदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. डोंबिवली विजयनगरचे रहिवासी ओम वायंगणकर, संजीत वायंगणकर यांचा घरी इको फ़्रेंडली बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण पर्यावरण स्नेही शाडूची मूर्ती, खरी फुलझाडे व कागदी ग्लासची आरास बनवून बप्पाची स्थापना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here