कल्याण_लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी दिव्यांग सहाय्य शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून गरजू लाभार्थींची यादी तयार करण्यात आली होती. आज शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तिसाई देवी माता मंदिर मैदान, कल्याण (पूर्व) येथे आयोजित भव्य मेळाव्यात रॅमन मॅगसेसे पुरस्कारने सन्मानित ज्येष्ठ समाजिक कार्यकार्ते मा. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते १ हजार हून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हील चेअर, हिअरिंग एड, कॅलिपर, ब्रेल किट, स्मार्ट फोन आदी साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच कृत्रिम अवयव शस्त्रक्रिया, एल्बो क्रच आदी मदत देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गाणी आणि नृत्याचे सादरीकरण केले. कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट चढणारे विनोद रावत यांनी प्रेरणादायी कहाणी याप्रसंगी ऐकवली. आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार सुभाष भोईर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे महापालिका महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवली महापौर विनिता राणे, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याणचे महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कडोंमपा शिवसेना नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here