दररोज १हजार २०० टन निर्माण होणाऱ्या थर्माकोलची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना उपलब्ध नसल्याने पर्यावरणाचा तसेच आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच गणेशोत्सवातही थर्मोकोल बंदी उठवू शकत नाही असे स्पष्ट्मत मुबई उच्च न्यायालयाने व्यक्त करून थर्मोकोल वरील बंदी कायम ठेवली आहे थर्मोकोल फेब्रिकेटर्स एंड डेकोरेटर्स असोसिएशन तर्फे केलेली याचिका निकाली काढली. थर्माकोलची घाऊक खरेदी बरीच आधी केली जाते.त्यापासून अलीकडच्या काळात गणेशोत्सवात तयार मखरांना मोठी मागणी असते तसेच सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात थर्मोकोलचा वापर केला जातो.सजावट कामावर हजारो कलाकार काम करतात. ते सर्व या बंदीमुळे रोजगाराला मुकणार असल्याचे याचिका कर्त्यांचे म्हणणे होते. या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अभय ओक,न्यायमूर्ती रीयाझ छगला.यांच्यासमोर झाली.शासनातर्फे याचिकेला विरोध करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणले की थार्मोकोलची विल्हेवाट लावण्यासाठी २३ जून पर्यंत मुदत देण्यात आली होती .याचिका कर्त्यांनी ती पाळली नाही.अजूनही याचिका कर्त्यांनी थार्मोकोलची विल्हेवाट लावली नाही .आता ते बंदी शिथिल करण्यासाठी न्यायालयात आले आहेत.******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here