काल जाहीर झालेल्या राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेत डोंबिवली शहरातील मुलीनी नेहमी प्रमाणेच शंभर नंबरी यश मिळवले.चंद्रकांत पाटकर विद्यालयातील श्रुतिका महाजन आणि टिळक नगर शाळेतील सिद्धी करकरे या दोघांनी १०० टक्के गुण मिळवले.तसेच विद्यानिकेतनच्या सानिका गायकवाडहिने ९९.८० टक्के गुण मिळवले.या सर्वांचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे. डोंबिवलीच्या सानिका गायकवाडहिला इंजिनियर व्हायचे आहे.त्यामुळे तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.पाटकर विद्यालयाच्या श्रुतिका महाजन हिला ९७ टक्के गुणमिळाले ,ती भरत नाट्यम करते त्यामुळे नृत्य कलेचे तिला तीन गुण मिळून एकूण १०० टक्के गुण मिळाले आहेत.तिचे वडील खाजगी कंपनीत कामाला आहेत.आई या गृहिणी आहेत.***** *********************हेड लाईन २ *श्रुतिका महाजनला भरत नाट्य कलेचे तीन गुण अधिक मिळाल्याने ती १०० टक्केची मानकरी ठरली. *अभ्यासात पालकांनी कोणताही दबाव आणला नव्हता. *तिला इंजिनियर व्हायचे आहे.म्हणून ती विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here