ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही या समस्येकडे आमदार एड.निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.त्यावर सर्व तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या असून त्यांचे वेतन दरमहा एक तारखेला बँकेत जमा केले जाईल.वेतन पथक आणि बँक यांच्यात समन्वय साधला जाईल असे ठाणे जिल्हा सहकारी बँकेने सांगितले. वेतन पथक,आणि बँकांमध्ये समन्वय साधण्यासाठी वेतन पथकासह जिल्हा बँक, संबधित बँकांची एड.निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन केले होते.यात हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील १८ हजार शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here