दुपारी 3-10 मी BPCL चेम्बुर-वडाळा जवळ माहुलगावाजवळ प्रचंड स्फोट होऊन सदर परिसर हादरला आहे .प्रचंड मोठा आवाजात स्फोट होऊन आग लागली असून प्रचंड धूर पसरला आहे .घटनास्थळी 15 अग्निश्मन गाड्या दाखल झाल्या आहेत .वडाळयाजवळ भारत पेट्रॊलियमचा मोठा प्लांट असून आजुबाजुला मोठी झोपडपट्टि देखील असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .परिणामी त्या ठिकाणी आग विझवन्याचे युध्दपातळीवर प्रयत्न चालू आहेत .घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here