मडगाव येथून सुटणारी दादर पॅसेंजर सिंधुदुर्गातूनच भरुन आल्याने रत्नागिरी येथील प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात मागच्या २ तासांपासून ही गाडी रोखून धरण्यात आली आहे. प्रवाशांसाठी राखीव असलेल्या बोगी रिकामी करुन दिल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा या प्रवाशंनी घेतला आहे. तर गेल्या दोन तासांपासून दादर पॅसेंजर स्थानकावर उभी असलेली गाडी न सोडल्यास प्रवाशांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पाच दिवसांचा गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या सिंधुदुर्गातील चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रत्नागिरी येथील प्रवाशांना पॅसेंजर मध्ये जागा न राहिल्याने प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेत ही पॅसेंजर ट्रेन मागच्या दोन तासांपासून स्थानकातच थांबवून ठेवली आहे. त्यामुळे या ट्रेनमधून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. तर एसपींनी या प्रवाशांना राखीव जागांवरुन उठण्याचे आवाहन केले आहे अन्यथा या प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी याच पॅसेंजरमध्ये पाणी न भरल्याने प्रवाशांच्या रोषाला सामोऱ्या जाव्या लागलेल्या कोकण रेल्वे प्रशासनाला आता या नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here