Shivneri News/Reporter Mitlesh Gupta/Edited by Rajan Varghese महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय श्री प्रमोद (राजू दादा) रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली एमआयडीसी येथील अस्तित्व या मतिमंद आणि गतिमंद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेत मनसे जिल्हा आणि शहरातील महिला / पुरुष पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील दिवसभराचे भोजन आणि संस्थेला देणगी देऊन गौरविण्यात आले. डोंबिवलीतील जननी आशिष या अनाथालयातील मुलांना आवश्यक वस्तूंचे वाटप तसेच देणगी देण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना तसेच विष्णूनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गोपीनाथ भोईर, जिल्हा संघटक राहुल कामत, जिल्हा सचिव प्रकाश माने, शहर अध्यक्ष मनोज घरत, शहर अध्यक्षा मंदाताई सुभाष पाटील, शहर सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील, शहर संघटक मनोज राजे, संजीव ताम्हाणे, उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे, उपविभाग अध्यक्ष विशाल बढे, मिहीर दवते, परभणी तालुका अध्यक्ष निलेश पुरी, महाराष्ट्र सैनिक हेमंत दाभोळकर, उपविभाग अध्यक्षा अंजना भोईर, महिला शाखा अध्यक्ष ज्योती खवसकर, मेधा चोरगे व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here