महाराष्ट्र एस टी कर्मचार्यांनी शुक्रवार पासून आपल्या वेतनवाढीसह प्रलंबित मागण्यासाठी अचानक संप पुकारला. यामुळे सामान्य प्रवाशासह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.या संपाचा खाजगी वाहतुकदारांनी चांगला फायदा घेऊन लुट केली. ठाणे वाहतूक विभागातील ४८ टक्के कर्मचारी संपावर गेले. हवामान खात्याने येते दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने अनेकांनी घरीजाण्याची घाई केली परंतु ते मध्येच अडकून पडले. याचा खाजगी वाहतूक दारांनी चांगलाच फायदा घेतला. सकाळी या संपला न जुमानता काही भागात बस वाहतूक सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला.पण संपकरी कर्मचार्यानी तो यशस्वी होऊ दिला नाही. ठाणे जिल्ह्यातील कल्याण ,विठ्ठलवाडी.मुरबाड वाडा,या बस आगारात दुपारपर्यंत बस सेवा सुरु होती.पण शहापूर,भिवंडी,थणे१,ठाणे २ येथील बससेवा बंद होती.*** हेड लाईन्स *अतीपावसाचा इशारा असताना संप न्कोहोता अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया. * ४८ टक्के कर्मचारी संपावर गेल्याने ठाणे विभागाचे ३० लाखाचे नुकसान. *एस.टी संपामुळे खाजगी वाहतूकदारांची “चांदी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here