आखाड्यात मल्लांना मातीत लोळवल्यानंतर आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी सज्ज झाला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात विजय चौधरी उपअधीक्षकपदावर रुजू झाला आहे. पोलीस अधीक्षक झाल्यावर आई वडिलांना सर्वाधिक आनंद झाल्याचं चौधरी यांनी म्हटलं आहे. यापुढेही रोज सहा तास सराव सुरु ठेवणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. हिंद केसरी किताब पटाकवणं हे पुढील लक्ष असल्याचं त्य़ांनी म्हटलं आहे. सलग तीनवेळा मानाचा “महाराष्ट्र केसरी” किताब पटकावणाऱ्या विजय चौधरी यांना नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ चा किताब जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. 10 डिसेंबर 2016 रोजी जळगावचा विजय चौधरी यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. विजय चौधरी यांनी पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here