महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बंद मधून ठाणे वगळले असून देखील प्रचंड पोलीस बंदोबस्त ,,,,,ठाणे रेल्वे स्टेशन जवळील बंदोबस्त आज सकल मराठा समाजाचा आरक्षण साठी मुम्बई ,ठाणे ,नवी मुम्बई आणि परळी वगळता सम्पूर्ण राज्यभर बंद यशस्वी झाल्याचे चिन्ह दिसत आहेत ,नागपूर शहरात आज आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला , बंदच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने अघोषित सम्प पुकारुण वाहतूक बंद केली .अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती , राज्याच्या अनेक जिल्हयात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे .अनेक ठिकाणी आपली जनावरेही रस्त्यावर आणलेली होती .अनेक राजकीय पुढारी देखील सम्पात सहभागी झालेले दिसून आले .सदर सम्पास मुस्लिम समाजानेही पाठिबा दिलेला दिसून आला , मुम्बईसह सम्पूर्ण राज्यात बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस कर्मचारीच्या रजा रद्द करून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here