सर्व सामान्यांचे वाहन म्हणून रिक्षा हे वाहन सर्व मान्य झाले आहे.तरीही या व्यवसायात मोठ्या प्रमाणात अवैधपणा,बेशिस्तपणा,तसेच रिक्षा चालकांची अरेरावी वृत्ती वाढत आहे.रिक्षा संघटना कार्यरत असूनही त्या प्रवाशांचे हित न पाहता रिक्षा नेत्यांचे आणि रिक्षा चालाकांचेच हित पाहत असल्याने सर्वसामान्य प्रवासी हतबल झाला आहे.हे लक्षात घेऊन शिवनेरी न्युज या वृत्त वाहिनीने या विरुद्ध मोहीम सुरु केली.प्रथम कुर्ला साकीनाका येथील रिक्षाचालकावर त्यांनी हल्लाबोल केला. रिक्षेत फक्त तीन प्रवाशांना वाहतूक करण्याची परवानगी असतानाचक्क रिक्षा चालकाच्या शेजारी चौथा प्रवासी बसवून व्यवसाय करतात. यामुळे अपघाताची भिती तर असतेच पण पुढे बसणाऱ्या प्रवाशाला अपघात विम्याचेही सरक्षण मिळू शकत नाही. साकीनाका वाहतूक विभागाचे पोलीस उप निरीक्षक माने यांनी आता रिक्षा चालकांवर कारवाई सुरु केली आहे. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जसवंत यादव यानाही या सबधात प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या या संघटनेची नोंदणीच झाली नसल्याचे व रिक्षा संघटनेचा सर्व कारभारच अवैध असल्याचे आढळून आले. ***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here