मुंबई- लोकांचे जीव जात असताना तुम्ही नुसते पहात बसणार का? दुर्घटनाची जबाबदारी घेणार की नाही.? रेल्वे ही परदेशी संस्था आहे का? ह्द्दींचा प्रश्न कसा निर्माण होतो असे अनेक प्रश्न निर्माण करीत मुंबईतील नागरिकाशी निगडीत कोणत्याही प्रश्नांची किवा दुर्घटना ची जबाबदारी ही मुंबई महापालिकेचीच राहील असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मंगळवारी अंधेरीत पूल कोसळून पाचजण जखमी झाले.या घटनेनंतर पुलाच्या देखभालीची जबाबदारी नाकारण्याचा उद्योग रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी केला,त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया नागरीकातून उमटत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here