कल्याण –मुंब्रा शिळ रस्त्याचे काम सुरु असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण मार्गे वळवण्यात आल्याने कल्याणच्या नागरिकांना ऐन गर्दीच्यावेळी प्रचंड वाहतूक कौडीला तोंड द्यावे लागत आहे. सूचक नका ते बैल बाजार आणि नमस्कार मंडळ ते दुर्गाडी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच पाद्चार्याना काही मिनिटाच्या अंतरासाठी एक ते दीड तास लागतो. या मार्गावरून रिक्षा चालकही वाहने नेण्यास तयार होत नाहीत. सायंकाळी आधारवाडी चौकात भिवंडीकडे जाणारी वाहने,दुचाकी आणि चारचाकी वाहने यांची एकच कोंडी होते यामुळे शिवाजी महाराज चौकातून वाडीत रिक्षा भाडे नाकारत असल्याने कामाहूनघरी परतणाऱ्या महिला, पुरुषांचे प्रचंड हाल होत आहेत. आधारवाडी चौकात ,दुर्गाडी किल्ल्याजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे एकेकतास वाहने अडकून रहातात.व्हाहतूक पोलीस असूनही त्यांना वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणणे शक्य होत नाही.यातच पावसाने आग्रारोडवर रस्त्याच्या मध्येच खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या हालात भरच पडते. या मार्गावर माध्यमिक शाळा असल्याने स्कूल बसेस या कोंडीत अडकून मुलांना घरी किवा शाळेत वेळेवर जाने शक्य होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here