श्री साईबाबांच्या समाधीला येत्या 18 ऑक्टोबरला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचा समाधी शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. हेच औचित्य साधून “चांदिवलीचा महाराजा” म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रमुख मार्गदर्शक श्री. ईश्वर तायडे यांचे स्वप्न म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षात ‘प्रतिशिर्डी’ चा भव्य देखावा चांदिवली म्हाडा वसाहतमध्ये 20,000 sq ft. मैदानावर साकारला आहे.  ‘होते या भूमीचे पुण्य काही ! तरीच ये ठायी पातली ‘श्रीसाई’॥  संपूर्ण मुंबईकरांना शताब्दी वर्षात दर्शन देण्यासाठी शिर्डीचे साईबाबा चांदिवलीत अवतरणार, हे या भूमीचं व चांदिवलीकरांच परम भाग्य आहे… सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री अमन विधाते यांचे संकल्पनेप्रमाणे “श्रीसाई समाधी मंदिर, द्वारकामाई मंदिर, खंडोबा मंदिर, प्रशस्त राजमहलात विराजमान “चांदिवलीचा महाराजा” आणि तीन भव्य दिव्य प्रवेशद्वार ही या वर्षीची खास वैशिष्ठे आहेत.. याशिवाय खास इंदूरहून आलेल्या कारागीरांकडून संपूर्ण म्हाडा वसाहतीला रनिंग सिलींग लाईटची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील सर्व साईभक्त व पदयात्री मंडळांनी व गणेशभक्तांनी दर्शनासाठी एक वेळ आवश्य भेट द्यावी असे आवाहन मार्गदर्शक श्री. ईश्वर तायडे यांनी केले आहे. मुंबई उपनगरातील हा सर्वात भव्य दिव्य असा देखावा असून हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष – रविंद्र नेवरेकर सचिव – प्रमोद हुले कार्याध्यक्ष – विष्णू आवटे खजिनदार – धर्मन रावत महिलाध्यक्ष – समिधा काळसेकर व सर्व पदाधिकारी गेले तीन महिने आयोजन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here