टिटवाळा_ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कल्याण तालुक्यातील वर्प या गावी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आले असतानाच त्याच दिवशी म्हारळ या गावातील पाण्याच्या टाकीजवळ रहाणाऱ्या अंबिका रघु पिटकर या श्रमजीवीचा दीड वर्षाचा मुलगा घरातून अचानक बेपता झाला आहे.मुख्यमंत्र्याच्या बडोबास्तासाठी सारी पोलीस यंत्रणा अडकली असल्याने मुल बेपत्ता झाल्याची फिर्याद टिटवाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ५ जुलैरोजी नोंदवून घेतली. विशेष उल्लेखनीय म्हणजे गेल्या सहा महिन्यात टिटवाळा पोलीस ठाण्यात ३४ मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.बाल्ल्याणी यागावातील सर्वात जास्त म्हणजे नऊ मुले बेपता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या बेपत्ता मुलांपैकी २४ बेपत्ता मुलांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here