खड्डे भरण्याची मोहिम तीव्र करतानाच वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी यापुढे रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज बांधकाम विभागाला दिले असून महापालिकेची सर्व यंत्रणा या मोहिमेतंर्गत रात्र-रात्रभर काम करणार आहे. अवजड वाहतूक आणि संततधार पावसामुळे शहराच्या प्रवेशद्वारापासून ते शहरातून बाहेर पडणा-या प्रमुख रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले होते. सदरचे खड्डे भरण्याची कार्यवाही महापालिका युद्धपातळूवर भरण्याची कार्यवाही करीत आहे. परंतू दिवसा खड्डे भरताना वाहतुक कोंडी होत असल्याने रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याची कार्यवाही आजपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून वाहतुक पोलिस शाखेशी समन्वय साधून हे खड्डे भरण्यात येणार आहेत. दिवसाच्यावेळी खड्डे भरताना वाहतुक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास होवू नये म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्रीच्यावेळी खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज सकाळी महापालिका आयुक्तांनी नगर अभियंता आणि सर्व अभियंत्यांची तातडीची बैठक घेवून रात्रीचा दिवस करून खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर प्रभाग समितीनिहाय महत्वाची ठिकाणे निश्चित करून विविध पथके तयार करून खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान रात्रीच्या वेळी काम करताना कुठलाही त्रास होवू नये यासाठी अतिक्रमण विभागाकडे असलेले पोलिस कर्मचारी प्रत्येक पथकासोबत देण्याच्या सूचना श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत केल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here