कल्याण डोंबिवली बदलापूर परिसरासह ग्रामीण भागात रात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र याचा जनजीवनावर विशेष परिणाम झाला नाही.मध्यरेल्वेच्या काही उपनगरी स्टेशनात लाईनीत पाणी साचल्याने उपनगरी गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.तरीही ३०ते ४० मिनिटे उशिराने लोकल वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. सकाळी गाड्यांच्या गोंधळामुळे गाड्यांना गर्दी होती .रस्त्यात रिक्षा कमी असल्याने पादचार्याना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. एस.ती.गाड्यांची वाहतूकही नेहमी प्रमाणे सुरु होती.नाशिक,पनवेल.शहापूर.भागातून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारे भाजीपाल्याचे ट्रक आले.पण कल्याण परिसरातील ग्रामीण भागातून येणारे भाजी विक्रेते शेतीच्या कामात गुंतल्याने खेड्यावरून येणाऱ्या भाज्या आज आल्या नाहीत. महापालिकेने स्वच्छता मोहिमेवर तसेच पाणी साचलेल्या भागात जंतू नाशकांची फवारणी करण्याच्या कार्यक्रमावर जोर दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here