Shivneri News/Reporter Neha Kamble/Edited by Rajan Varghese उस्मा पेट्रोल पंप, टेक्नो पेट्रोल पंप व व्यंकटेश पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस दरवाढी व महागाई चा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याण डोंबिवली तर्फे म. गांधीजींच्या तत्वानुसार एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले. एक ही भूल कमल का फुल , इंधन दरवाढिचा निषेध असे फलक घेऊन घोषणाबाजी केली. पुन्हा कमळला मतदान करून भूल करू नका असा नागरिकांना आवाहन केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटिल, महिला जिलाध्यक्षा सारिका गायकवाड़, कार्यध्यक्षा विनिया पाटिल, माजी नगरसेवक नंदू धुळे, डोंबिवली शहर सरचिटणीस जगदीश ठाकुर, प्रसन्ना अचलकर, राजेन्द्र नान्दोस्कर, भाऊ पाटिल, निरंजन भोशले, पूजा पाटिल, आदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here