मुंबई गोवा मार्गावरील सावित्री नदीवरील पूल दुर्घटने नंतर शासनाने राज्यातील मार्गावरील सर्व पुलांच्या क्षमतेची तपासणी केली.पण रेल्वे पुलांच्य बाबतीत काय ? मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील जुन्या पुलांची स्थिती धोकादायक असून काही पूल हे अत्यंत कमकुवत झाले आहेत. केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते.अशी काही प्रकरणे समोर आली आहेत.वालधुनी,उल्हासनदी, काळूनदी, भातसा नदी,या नद्यांवरील तसेच उपनद्या वरील बांधण्यात आलेल्या पुलांची क्षमता केव्हाच संपली आहे.अतिवृष्टीमुळे या पुलांना धोका निर्माण होऊन कोणत्याही क्षणी गंभीर स्वरुपाची घटना घडू शकते.कल्याणचा जुना पत्रीपूल,वालधुनी पूल,शहाड आंबिवली पूल, टिटवाळा,उल्हासनगर,या पुलांचीही याहून वेगळी स्थिती नाही. उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या ,उपनगरी रेल्वेच्या ७००हुन अधिक गाड्यांची या पुलांवरून वाहतूक होत असून रोज २५ लाखाहून अधिक प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात.सावित्रीनदी पूल दुर्घटने नंतर राज्यातील पुलाचा प्रश्न समोर आला.काही पुलांची तातडीने पाहणी करण्यात आली.पण रेल्वे बाबतीत काहीही निर्णय झाला नव्हता. कल्याण कसारा हा ६९ किलोमीटरचा मार्ग आहे.त्यावर बारा स्थानके असून आठ मोठे व ११९ लहान पूल आहेत.कल्याण कर्जत कसारा प्रवासी संघटनेने या पुलांची पाहणी केली तेव्हा वाशिंद जवळील भातसा नदीवरील पूल खचल्याचे लक्षात आले.******** हेड लाईन. वाशिंद जवळील रेल्वे पूल खचल्याचे कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या निदर्शनास आले. कल्याण जवळील जुना पत्रीपूल धोकादायक. कल्याण कसारा मार्गावरील लहान मोठ्या ११९ पुलांची तातडीने पाहणी करण्याची आवश्यकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here