कल्याण च्या आदिवासी वसतिगृहात राहून राष्ट्र सेवादलाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून पालघरच्या आदिवासी तरुणाने स्पर्धा परीक्षेत उज्वल यश सम्पादन केले त्र्याची महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विभागात श्रेणी कारे एक मधील उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आदिवासी वस्ती गृहात त्याचे सहकारी राष्ट्र सेवा दलाच्या कल्याण डोंबिवली विभागाचे कार्याध्यक्ष अनुपकुमार पांडे सुहास कोते, विशाल जाधव,मधुरटन पगारे यांच्या सह इंदिरा नगर वसाहतीतील नागरिकांनी त्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते. कल्पेश हा जव्हार तालुक्यातील राहणार आहे. त्याचे वडील हे निरक्षर असून मोलमजुरीवरच त्यांचा निर्वाह चालतो मोलमजुरी करीतच त्यांनी कल्पेशचे शिक्षण पूर्ण केले. आपला मुलगा साहेब झाल्याची बातमी त्यांच्या आई वडिलांना समजताच त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या सारखेच शिकून त्याने आपल्या समाजातील मुलांनाही मोठे करावे त्याच प्रमाणे आपल्या समाजाला वेगळे न मानता आता त्याच्यासाठी काम करावे अशी आपल्या भाषेत तिने अपेक्षा व्यक्त केली सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून नगर सेवक संजय पाटील यांनी या अभ्यासिकेची सेवा दलाच्या साहाय्याने निर्मिती केली गेल्या चार वर्षात या अभ्यासिकेचा लाभ घेऊन अनेक तरुण तरुणी सी ए ,आय सी डब्ल्यू, बँक ऑफिसर, रेल्वे तील अधिकाऱ्यांच्या पदावर कार्यरत आहेत ऍसिड अनुपकुमार पांडे यांनी सांगून कल्पेशचे कौतुक केले.

SHOW MORE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here