सोमवार पासून मुंबईसह उपनगरे, ठाणे जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. येत्या 24 तासात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकण विभागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीच हा पाऊस होत असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले.
यावेळी मान्सून यालाच जोडून सुरु होण्याची शक्यता वर्तवून शुभांगी भुते यांनी सांगितले. 20 मे रोजी अंदमान, निकोबार बेटावर मान्सून पोहोचेल. यानंतर तारीख 24 मे रोजी तो श्रीलंकेत दाखल होईल. त्यानंतर बंगालच्या उपसागरावरून मान्सून प्रवाह सुरू होईल.
मराठवाड्यात लातुर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात कालही पावसाने हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here