देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप प्रकल्पाची लिव्हरपूल लंडन येथे होणा-या आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टीव्हलमध्ये शोकेस करण्याची संधी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एेनवेळी मंजुरी न दिल्याने हुकली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होता येणार नाही त्यामुळे संतापलेल्या प्रशासनाने महापौर मीनाक्षी शिंदे यांना याबद्दल दोषी ठरवून प्रसिद्धी पत्रक काढले आहे. ब्रिटीश सरकारच्यावतीने 18 ते 22 या कालावधीत लिव्हरपूल लंडन येथे आंतरराष्ट्रीय बिझनेस फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये महापालिकेच्यावतीने देशातील सर्वात मोठ्या स्टार्टअप प्रकल्पाचे प्रदर्शन मांडण्यात येणार होते. त्याचबरोबर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना या प्रकल्पाविषयी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. यासाठी एकूण 8.50 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता. सदरचा विषय महत्वाचा असल्याने आयत्यावेळी मान्यतेसाठी महासभेसमोर पाठविण्यात आला होता. त्यावेळी यासाठी महासभेची मान्यता मिळाली नाही. यानंतर या संदर्भात महापालिका सचिव अशोक बुरपल्ले व उपायुक्त संदीप माळवी यांनी महापौर मिनाक्षी शिंदे यांना विनंती केली होती. परंतू त्यांनी त्यास नकार दिला. आताच माझ्या सहीची गरज का भासली? 18 मे रोजी महासभा झाली. तब्बल 22 दिवसांनंतर मला आयुक्तांच्या परदेश दौऱ्यासाठी साडेआठ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. एवढेच नव्हे तर आयत्या वेळचा विषय दाखवून हा खर्च मंजूर करावा, असेही सांगण्यात आले. हे नियमाच्या विरोधात आहे. यापूर्वीदेखील आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनेकदा परदेश दौरे केले, आधी त्याचा खर्च द्या. यापूर्वीच्या दौऱ्यांना महासभेची मंजुरी घ्यावीशी वाटली नाही. मग आताच माझ्या सहीची गरज का भासली? 24 मे ते 28 जूनपर्यंत आचारसंहिता सुरू असून त्याचेही भान राखायला हवे. लंडनच्या दौऱ्यासाठी मी मंजुरी दिली नाही म्हणून अशाप्रकारे पत्रकबाजी करून माझा अपमान होणार असेल तर प्रशासनाला आगामी महासभेत त्याचे उत्तर द्यावेच लागेल. असे मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here