कल्याण तालुक्यातील आदिवासी,कातकरीपाडे,दलित वस्त्या यामधून मुलांसाठी कार्यकरणाऱ्या विनहोम या संस्थेतर्फे वाघेरेपाडा येथे आदिवासी मुलांसाठी तीन दिवसांचे उन्हाळी शिबीर आयोजित केले होते.त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विनहोम संस्थेच्या,सि.विनयलता यांनी शिबिराचा शुभारंभ केला. या शिबिरात मुलांना चित्रकला,कागदाच्या टोप्या,बाहुल्या,खेळ,नृत्य,यांचे शिक्षण देण्यात आले. आदिवासी कार्यकर्ता विशाल जाधव यांनी साने गुरुजींच्या ‘शामची आई’ पुस्तकाचे रोज रात्री सामुहिक वाचन घेऊन कौटुंबिक जिव्हाळा,सामाजिक संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले.
या शिबिरात प्रामुख्याने अंधश्रद्धा, भूतबाधा, करणी हे कसे फसवे व खोटे असते, त्यात आपण कसे फसतो हे निरनिराळ्या प्रयोगातून मुलांना पटवून दिले. तीन दिवसाच्या या शिबिरास सुनिता जैन, सुनिता भांगे, आशा, सुरेखा व अनेक युवकांनी सहकार्य केले. *****************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here