मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या विहिरीत बुडून दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे विश्वकर्मा समाजातील महिला भाविक पूजेनंतर विहिरीजवळ बसले असताना स्लॅब तुटल्याने ही दुर्घटना घडली. विहिरीत पडलेल्या नऊ महिला आणि एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आले आहे. विलेपार्ल्यातील शिवसागर हॉटेलच्या मागील भागात दीक्षित रोडवर असलेल्या विहिरीत ही दुर्घटना घडली कुंकू वाडी भागात राहणाऱ्या विश्वकर्मा समाजातील महिला पूजेसाठी विहिरी जवळ असलेल्या देवळात गेल्या होत्या पूजेनंतर महिला विहिरीजवळ बसल्या असताना संध्याकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास स्लॅब तुटला आणि 12 महिला आणि दोन चिमुकले विहिरीत पडले उपस्थितांनी तात्काळ साड्या आणि ओढण्या यांच्या मदतीने काही महिलांना विहिरीतून बाहेर काढलं अग्निशामक दलाचे जवान महापालिका प्रशासन पोलीस यांना स्थानिकांनी बचाव कार्यात मदत केली विहिरीतून तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले पाणी उपसल्यानंतर बचाव कार्य थांबवण्यात आलं यामध्ये तीन वर्षे दिव्या चंद्र यादव 25 वर्षीय रेणू बुद्धु यादव आणि 55 वर्षे जमुरत बुद्धु यादव यांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here