शनिवारी झालेल्या वादळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील पतन बंदर किनारी सकाळी वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर अन्य सहा गंभीर जखमी झाले.संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. अनेक घरातील विजेचे मीटर जळाले,फ्रीज, मिक्सर. विजेची उपकरणी यांचे मोठे नुकसान झाले. उत्तन पाली चौक भागातील अनेक लोक सकाळी नैसर्गिक विधीसाठी समुद्र किनारी जातात. स्तानिस इनस अदमानी हा आपल्या घराच्या मागे समुद्र किनारी गेला असता जोराच्या वादळी पावसात विज पडून तो जबर भाजला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.अन्य सहा व्यक्ती अशाच  समुद्र किनारी गेल्या  असता विजेचा लोळ त्यांच्या अंगावर पडून ते गंभीर स्वरूपाचे भाजून जखमी झाले.. *********************हेड लाईन केंद्र शासनाच्या घर तेथे  सौचालाय योजनेचा फज्जा. विजेच्या अनेक उपकरणाचे मोठे नुकसान,गावातील वीज गायप. अचानक आलेल्या विजेच्या लोळाने साऱ्या गावात घबराट, सामाजिक कार्यकर्त्यांची मोलाची मदत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here