गणेशोत्सव मित्र मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडत असतो, ती एक कार्यशाळा असून त्यातून अनेक उदयोन्मूख कार्यकर्ते राजकारणासह समाजकारणाला मिळाले आहेत. ठाणे जिल्ह्यात स्व. धर्मवीर आनंद दिघे, तसेच राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा भरवून समाजात एक चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले. ते कार्य शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवसेनेचे नासिक जिल्हा संपर्कप्रमुख आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चौधरी करत आहेत. त्यांचे कार्य वाढत जावो अशा शब्दात डोंबिवलीचे प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी कौतुक केले. येथील शिवसंस्कृति प्रतिष्ठानच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या श्री गणेशदर्शन स्पर्धेमध्ये गोग्रासवाडी भागातील शिवनेरी गणेशोत्सव मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक आला. बुधवारी हा पारितोषिक वितरण समारंभ टिळक पथ येथील ब्राह्मण सभेमध्ये संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्या स्पर्धेतच राजाजीपथ गणेशोत्सव मंडळाचा द्वितीय तर पश्चिमेकडील गोकूळ मित्र मंडळाला तृतिय क्रमांकाचे मानकरी म्हणुन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक पटकावणा-या मंडळाला रोख रक्कम ३१ हजार, द्वितीय २१ हजार रोख, तृतिय क्रमांकाला ११ हजार रूपये तर उत्तेजनार्थ आणि आकर्षक मूर्तीसाठी ५ हजार रूपये रोख रक्कम देण्यात आली. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, स्थायी समिती सभापती राहुल दामले, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक दिपेश म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रतिष्ठानचे ललित शाईवाले, राज परब आदीही उपस्थित होते. यावेळी खासदार शिंदे, भाऊसाहेब चौधरींसह परिक्षकांची मनोगते व्यक्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here