शैषणिक आणि अन्य शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध शासकीय दाखले संबंधिताना एकाच दिवसात उपलब्ध व्हावे या उद्देशाने कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक निलेश शिंदे आणि जेष्ठ शिवसैनिक शरद पाटील यांनी दाखले वाटप शिबिराचे आयोजन रविवारी कोळसेवाडी येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे केले होते. या शिबिरास कल्याण पूर्वेतील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद देत शिबीर यशस्वी केले. या शिबिराच्या प्रसंगी शिवसेना कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर राजेन्द्र देवळेकर, अरविंद मोरे, रवींद्र कपोते, अशोक म्हात्रे, नगरसेवक नवीन गवळी हर्षवर्धन पालांडे, सी. पी. मिश्रा, मनोज बेळमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळा, कॉलेजेस तसेच विविध कारणांसाठी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेले शासन पातळीवरील उत्पन्नाचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय आदीवास दाखलाआदी दाखले या शिबिरात एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यात आले. या दाखले शिबिरात एक हजारहून अधिक दाखले देण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांचे सहकार्य लाभले. नगरसेवक निलेश शिंदे आणि शरद पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केल्या बद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here