कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दहिसर ग्रामपंचायतीच्या सदस्या व विद्यमान सरपंच सुनिता भरत भोईर यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली असून नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी चुकीचे व खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली आहे.त्यामुळे त्याच्यांवर कायदेशीर कारवाईची करून त्याचें सदस्य पद आणि सरपंचपद रद्द करावे अशी मागणी याचं गावचे रहिवासी काळुराम भोईर सर्व पुराव्यांसह अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडील एक सरपंचपद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार मंडल अधिकारी यांनी आपला चौकशी अहवाल सादर केला असून यावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोटे जन्मदाखले देऊन तिसरे अपत्य असल्याचे लपविल्या प्रकरणी सुनिता भरत भोईर यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत सुनिता भोईर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here