गावचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. पूर्वीच्या मच्छीमारी शेती हे परंपरागत व्यवसाय सांभाळत असताना इथल्या मूळच्या रहिवाश्यांनी मुंबई आणि कोकणातून आलेल्या अनेक समाज बांधवानाहि आपल्यात सामावून घेतले अशीच बाहेर गावातून आलेली वाढत्या महामार्गात संसारच गाडा सुरळीत चालव्हायचा तर पती पत्नी दोघांनीही कामावर जाणे भाग आहे अशा वेळी सकाळी डबा बनवण्याचा किंवा घरच्यांना ताजे अन्न पदार्थ बनवण्याचा प्रश्न निर्माण होतो दिव्यातील हा प्रश्न सोलापूर हुन आलेल्या एका मराठी कुटुंबाने सहजरित्या सोडवला आहे. सोल्हापूर जिल्ह्यातील उमरगा येथील संतोष नारसिंग मुळे त्यांची पत्नी यांनी दोन तीन गरजू महिलांना मदतीला घेऊन अगदी घरगुती स्वरूपाचे आरती घरगुती जेवण घर तयार करुण सकाळी कामावर जाणाऱयासाठी घरगुती जेवणाचे पार्सल देण्यास सुरुवात केली त्यामुळे दोन किंवा तीन पालेभाज्या डाळ भात, मांसाहारी लोकांसाठी खास मांसाहारी पदार्थही मिळत असल्याने त्यांच्या अन्नपूर्णा केंद्रावर नेहमीच प्रचंड गर्दी असते स्वच्छता टापटीप आणि सर्व सामान्यांना परवडणारे दरात जेवण तयार करून दिले जाते. ग्राहक आमचे जेवण खाऊन समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात हेच आमचे खरे समाधान असे मुळे नेहमी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here