बांधकाम विरोधी पथकाने कारवाई केली. हे गाळे अनधिकृत असून पालिकेने त्यांना आगाऊ नोटीस बजावली असल्याचे प्रशासनाचे ,म्हणणे आहे. मात्र अनेक वर्षापासून आमचे गाळे असून पालिकेची कारवाई चुकीची असल्याचा आरोप गाळेधारकांनी केला आहे.

स्वामी समर्थ मठासमोर श्री शंकर स्वीट मार्ट , व्ही. के. इलेक्ट्रॉनिक आणि राकेश ग्रेन स्टोर्स असे तीन गाळे अनेक वर्षापासून आहेत. पालिका प्रशासनाने गाळेधारकांना आगाऊ नोटीस देऊन गाळे रिकामे करण्यास सांगितले होते. यावेळीपालिकेने दोन जे.सी.बि.च्या सहाय्याने सदर गाळे जमीनदोस्त केले. सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी गाळेधारक महेंद्र जयस्वाल यांनी पालिकेची कारवाई चुकीची आहे.दुकानात ठेवलेले आधारकार्ड, पॅन कार्ड,महत्वाची कागदपत्रे आणि एक पिशवीत ठेवलेले पैसे या कारवाईत गहाळ झाले असून याला पालिका प्रशासन जबाबदार आहे. या दुकानाच्या आधारे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याचे सांगितले. पालिकेने १५ दिवसात गाळे रिकामे करण्यास सांगितले होते. मात्र अचानक ही कारवाई होत असेल तर आमच्यावर अन्याय केल्याचेहि सांगितले. तर `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी मात्र कारवाई योग्य असून २४ तासात गाळेधारकांना गाळे रिकामे करण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here