शिवसेनेच्या कार्यसम्राट नगरसेविका अंकिता पाटिल यांचा वाढदिवसाचा आंनदी सोहळा..

दिवा -(सुभाष पटनाईक) दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ च्या शिवसेनेच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ.अंकिता विजय पाटील यांचा वाढ दिवस आनंदात साजरा करण्यात आला.
दिवा गावात तसे शिवसेनेचे आठ नगर सेवक कार्यरत आहेत.महिला चार व पुरुष चार ;परंतु नगर सेविका अंकिता पाटील या वयाने सर्व नागरसेवका पेक्षा लहान असून तरुण तड़फदार अशी त्यांची ख्याति असून, २७ प्रभागामधुन त्या फार लोकप्रिय आहेत.विभागात पाणी समस्या ,विजसमस्या,गटारे ,पायवाटा,तसेच नागरिकांच्या विविध अडिअडचणीच्या समस्या सोडविण्याचा मान मिळविला आहे. म्हणूनच ठाणे महानगर पालिकेच्या वतीने एकूण शंभर नगरसेवकांना उत्कृष्ट नगर सेवक /सेविका असा विशेष पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला होता.
त्या पुररस्काराचे सौ. अंकिता विजय पाटील या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.हे देखील येथील प्रभागातील सर्व नागरिकांना अभिमानाची गोष्ठ आहे;म्हणूनच २२एप्रिल रोजी त्यांच्या प्रभागत त्यांच्या वाढ दिवसानिमित्त स्थानिक ग्रामस्त व नागरिक ,हितचिंतक ,समाज सेवक ,कार्यकर्त्यांनी ,कार्यसम्राट नगर सेविका अंकिता विजय पाटील यांना मनापासून लाख-लाख शुभेच्छा देण्यासाठी बाहुगर्दी करुन त्यांना पुष्पगुच देवून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आनंदाची आणि योगायोगाची गोष्ट अशी की त्यांचे धीर सचिन राम पाटील यांचा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी वाढदिवस असून एकाच घरात एकाच महिन्यात दोघांचा वाढ दिवस योग असा आला आहे.
दरम्यान या शिवसेनेच्या नगर सेविका अंकिता विजय पाटील यांच्या वाढदिवसाच्या
शुभमुहर्तावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते दिवाच्या बीआर नगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे ही उद्घाटन करण्यात आले होते.या प्रसंगी शिवसेनेचे दिग्गज पदाधिकारी ,नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित राहून कार्यक्रम सोहळा आनंदाने साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here